Rajinikanth Movies : रजनीकांत यांच्या ‘या’ चित्रपटांनी थिएटर्समध्ये घातला धुमाकूळ; एकाने तर कमावलेत ६७५ कोटी!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rajinikanth Movies : रजनीकांत यांच्या ‘या’ चित्रपटांनी थिएटर्समध्ये घातला धुमाकूळ; एकाने तर कमावलेत ६७५ कोटी!

Rajinikanth Movies : रजनीकांत यांच्या ‘या’ चित्रपटांनी थिएटर्समध्ये घातला धुमाकूळ; एकाने तर कमावलेत ६७५ कोटी!

Rajinikanth Movies : रजनीकांत यांच्या ‘या’ चित्रपटांनी थिएटर्समध्ये घातला धुमाकूळ; एकाने तर कमावलेत ६७५ कोटी!

Nov 11, 2024 03:56 PM IST
  • twitter
  • twitter
Rajinikanth Biggest Blockbuster Movies: सुपरस्टार रजनीकांत यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी करणं तसं कठीण आहे. परंतु, त्यांच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
सुपरस्टार रजनीकांतचा स्वॅग असा आहे की, जगभरातील लोक त्यांना ओळखतात. रजनीकांतचा प्रत्येक चित्रपट खास असतो. आम्ही तुम्हाला रजनीकांतच्या अशा ७ चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चला तर मग जाणून घेऊया बॉक्स ऑफिसवर सुपरस्टार रजनीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ७ चित्रपटांची यादी…
twitterfacebook
share
(1 / 8)

सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये रजनीकांत यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'वेट्टियान - द हंटर' हा चित्रपट यादीत ७व्या क्रमांकावर आहे. अंदाजे २०० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात २०५.१० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
twitterfacebook
share
(2 / 8)

२०२०मध्ये रिलीज झालेला 'दरबार' हा चित्रपट रजनीकांतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ६व्या क्रमांकावर आहे. या चित्रपटात रजनीकांत यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून २०० कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने २१९ कोटींचा व्यवसाय केला होता.
twitterfacebook
share
(3 / 8)

या यादीत ५व्या क्रमांकावर २०१९मध्ये प्रदर्शित झालेला 'पेट्टा' हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी १३५ कोटी रुपये खर्च आला आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जगभरात २२३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. या चित्रपटात रजनीकांत यांनी हॉस्टेल वॉर्डनची भूमिका साकारली होती.
twitterfacebook
share
(4 / 8)

२०१०मध्ये रिलीज झालेला रजनीकांतचा 'रोबोट' चित्रपट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अवघ्या १३० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने त्यानंतर बॉक्स ऑफिसवर जगभरात २९० कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
twitterfacebook
share
(5 / 8)

२०१६ मध्ये रिलीज झालेला 'कबाली' हा चित्रपट रजनीकांतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ३ऱ्या क्रमांकावर आहे. सुमारे १२० कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने २९५ कोटींचा व्यवसाय केला.
twitterfacebook
share
(6 / 8)

गेल्या वर्षी आलेल्या 'जेलर' चित्रपटात पुन्हा एकदा रजनीकांत यांचा अँग्री मॅन अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटासाठी १८० कोटी रुपये खर्च आला आणि या चित्रपटाने जगभरात ६०५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. त्यामुळे हा चित्रपट यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
twitterfacebook
share
(7 / 8)

२०१०साली प्रदर्शित झालेल्या 'रोबोट' या चित्रपटाचा दुसरा भाग ‘२.०’ हा २०१८मध्ये आला होता, जो जगभरातील विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. रजनीकांतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत त्याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने जगभरात ६७५ कोटींचे कलेक्शन होते.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज