आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले. या कपलचा विवाहसोहळा हा घरीच आयोजित करण्यात आला होता. लग्नातील त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी तेलंगणातील एका मंदिरात लग्न केले. त्यांच्या गुपित लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह सोहळा ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे कडक बंदोबस्तात पार पडला. आपल्या लग्नाचे फोटो शेअर करताना या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, "आमच्या हृदयात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे ज्याने आम्हाला या क्षणापर्यंत आणले. आम्ही एकत्र या नव्या प्रवासाला सुरुवात करत असताना तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मागत आहोत.
अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांनी २३ जानेवारी रोजी लग्न गाठ बांधली. त्यांच्या लग्नातील फोटो हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाह २०२२ मध्ये खंडाळ्यातील जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या फार्महाऊसवर झाला होता. त्यांनी आपल्या लग्नाची नोंदणी देखील केली आणि त्यांच्या खास दिवसाचे काही फोटो शेअर केले.
डिसेंबर २०१८ मध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास विवाहबंधनात अडकले. दोघांनी पहिल्यांदा ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. त्यानंतर हिंदू पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला.