जर तुम्हाला सनी देओलचे चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी आम्ही त्याच्या आगामी चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत. यात ‘बॉर्डर २’, ‘गदर ३’, ‘जट’, ‘लाहोर १९४७’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
(1 / 7)
‘गदर २’ हिट झाल्यानंतर सनी देओलने अनेक चित्रपट साईन केल्याच्या बातम्या येत आहेत. यापैकी काहींची रिलीज डेट समोर आली आहे, तर काहींची आधीच घोषणा झाली आहे.
(2 / 7)
‘बॉर्डर’चा सिक्वेल ‘बॉर्डर २’ची घोषणा करण्यात आली आहे. हळूहळू त्याची स्टारकास्ट समोर येत आहे. फर्स्ट लुक अजून समोर आला नसला तरी, या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ असल्याचे निश्चित झाले आहे. आतापर्यंतच्या वृत्तानुसार हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
(3 / 7)
सनी देओल पुन्हा एकदा पाकिस्तानींना टक्कर देताना दिसणार. यावेळी त्याने या चित्रपटासाठी आमिर खानसोबत हातमिळवणी केली आहे. ‘लाहोर १९४७’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा फर्स्ट लुक अजून समोर यायचा आहे. या सिनेमात सनी देओलसोबत प्रीती झिंटा, आमिर खान, अली फजल आणि शबाना आझमी असल्याची बातमी आहे. आतापर्यंतच्या वृत्तानुसार हा चित्रपट २६ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
(4 / 7)
भारत मातेचा जयजयकार केल्यानंतर सनी देओलला जय श्री रामचा नारा देताना दिसणार आहे. नितेश तिवारीच्या रामायणमध्ये तो हनुमानाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटावर काम सुरू आहे. रामायण हा चित्रपट ऑक्टोबर २०२७मध्ये प्रदर्शित होईल.
(5 / 7)
गोपीचंद मलिनेनी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘जट’ चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत असल्याचीही बातमी आहे. वृत्तानुसार, चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. हा चित्रपट २०२५च्या उत्तरार्धात रिलीज होईल.
(6 / 7)
‘गदर २’च्या बंपर कमाईनंतर ‘गदर ३’च्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी यावर उघडपणे काहीही बोलले नसले, तरी ‘गदर ३’ची सुरुवात २०२५मध्ये होऊ शकते.
(7 / 7)
या सर्व चित्रपटांव्यतिरिक्त, सनी देओलचे बाप, अपने 2, सूर्या आणि जन्मभूमी या चित्रपटांच्या आगमनाच्या बातम्या आहेत. मात्र, या सिनेमांची अधिकृत घोषणा किंवा रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.