देवगुरु बृहस्पतीच्या विशेष स्थितीमुळे विपरीत राजयोग अत्यंत भाग्यवान मानला जातो. दरम्यान, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १४ मे रोजी सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश झाल्यानंतर सूर्य आणि गुरु ग्रहांचा वृषभ राशीत संयोग झाला असे म्हटले जाते. आता शुक्र अस्त अवस्थेत आहे. त्यामुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. बघूया, या शुभ विपरीत राजयोगाचा परिणाम म्हणून, कोणत्या राशीच्या लोकांना लाभ होणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, अनेक राशीच्या लोकांना या विपरीत राजयोगात फायदा होणार आहे. या विशेष योगामुळे पुढील ४ दिवस अनेक लोक श्रीमंत होणार आहेत. परिणामी १९ मेपर्यंत अनेक शुभ संधीसह चांगले दिवस येणार आहेत. बघूया, कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो.
मीन:
मीन राशीचे लोक या काळात खूप आनंदी राहतील. तुम्हाला सर्व कामात संपूर्ण यश मिळेल. एखाद्या कामाची अनेक दिवसांपासून काळजी असेल तर ते कार्य पूर्ण होईल. शेअर मार्केट सट्टाबाजार मधून खूप पैसे कमावता येतील.
कर्क-
या राशीच्या लोकांचे आरोग्य यावेळी चांगले राहणार आहे. १९ मे पर्यंतचा काळ धनप्राप्तीसाठी चांगला आहे. कारण नंतर शुक्र परिवर्तनामुळे हा योग संपुष्टात येईल. यावेळी तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
तूळ :
या राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोग खूप शुभ असणार आहे. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांसाठी वेळ खूप चांगला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेली समस्या संपुष्टात येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.