मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sun Transit : मिथुन संक्रांतीच्या दिवशी या गोष्टींचे करा दान; सूर्यदेव होईल प्रसन्न, लाभेल सुदृढ आरोग्य

Sun Transit : मिथुन संक्रांतीच्या दिवशी या गोष्टींचे करा दान; सूर्यदेव होईल प्रसन्न, लाभेल सुदृढ आरोग्य

Jun 09, 2024 02:59 PM IST
  • twitter
  • twitter
Sun Transit 2024 Daan Dharma : १५ जून रोजी मिथुन संक्रांत असून त्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी.  मिथुन संक्रांतीच्या दिवशी काही खास गोष्टींचे दान करण्याचा सल्ला दिला जातो, यामुळे सूर्यदेव प्रसन्न होईल.
प्रत्येक महिन्यात सूर्यदेव राशी बदलतो त्या दिवशी सूर्य संक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि दान केले जाते.  १५ जून रोजी सूर्यदेव वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत जात आहे. यामुळे १५ जून रोजी मिथुन संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी काही दान पुण्याचे कार्य करावे.
share
(1 / 6)

संक्रांत तिथीला सूर्यदेवाची पूजा केल्यास निरोगी आयुष्य प्राप्त होते, असे मानले जाते. याशिवाय सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासूनही आराम मिळू शकतो.  कुंडलीतील सूर्याला बळकट करण्यासाठी सूर्यदेवाची पूजा करावी. संक्रांतीच्या दिवशी काही खास वस्तूंचे दान करून मिथुन संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करू शकतात.
share
(2 / 6)

गव्हाचे दान : सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी मिथुन संक्रांतीच्या दिवशी गव्हाचे दान करावे. असे केल्याने राशीमध्ये सूर्य बलवान होतो. सूर्याच्या शक्तीमुळे व्यक्तीला व्यवसायात फायदा होईल.
share
(3 / 6)
गव्हाचे दान : सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी मिथुन संक्रांतीच्या दिवशी गव्हाचे दान करावे. असे केल्याने राशीमध्ये सूर्य बलवान होतो. सूर्याच्या शक्तीमुळे व्यक्तीला व्यवसायात फायदा होईल.(HT_PRINT)
डाळींचे दान : सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मिथुन संक्रांतीच्या दिवशी डाळींचे दान करणे फायदेशीर ठरते. डाळींचे दान केल्यावर सूर्यदेव प्रसन्न होतात. गरजू व्यक्तीला डाळ दान करा.
share
(4 / 6)

गुळाचे दान : मिथुन संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला गूळ मिश्रित जल अर्पण करण्याचा सल्ला ज्योतिषी देतात. फक्त गुळाचेही दान करता येईल. गुळात मिसळलेली मिठाईही दान करता येते.
share
(5 / 6)

लाल वस्त्रदान करा : सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी मिथुन संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा करा आणि नंतर गरिबांना लाल वस्त्रदान करा. या उपायाचे अनुसरण केल्यास खूप चांगले होईल.
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज