उन्हाळ्यात सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे आंबा. विविध प्रकारचे हंगामी आंबे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. पण हे खरेदी करताना फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी विविध प्रकारच्या आंब्यांची वैशिष्ट्ये जाणून घेणे आवश्यक आहे. चला आंब्याची वैशिष्ट्ये पाहूया…
कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील, हा आंबा चवीला सौम्य आणि हिरवट रंगाचा असतो. हा आंबा पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. याला तोतापुरी असे म्हणतात.
बंगीनापल्ली या आंब्याची साल पिवळसर रंगाची असून त्यावर काही डाग असतात. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील बानागनपल्ले येथे या आंब्याची निर्मिती होते.
केसर हा सर्वात महागड्या आंब्यांपैकी एक असतो. हा आंबा केसरी रंगाचा असतो. याचा वास अतिशय सुंदर असतो.
केसर हा सर्वात महागड्या आंब्यांपैकी एक असतो. हा आंबा केसरी रंगाचा असतो. याचा वास अतिशय सुंदर असतो.