अधिकचे गोड पदार्थ खाण्याचा हा छंद तुमचे वय फार लवकर वाढवू शकतो आणि तुम्हाला अनेक आजारांना बळी पाडू शकतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या अनेक संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे की, जास्त प्रमाणात साखर असलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात. चला जाणून घेऊया साखरेच्या अशाच काही दुष्परिणामांबद्दल…
साखरेचे जास्त सेवन केल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. ग्लुकोज हा शरीरासाठी उर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. परंतु, त्याची पातळी खूप वाढल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर, जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी इंसुलिनची संवेदनशीलता कमी करू शकते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. तुमच्या दैनंदिन आहारातील साखरेचे प्रमाण कमी करून तुम्ही हृदयरोग, टाइप २ मधुमेह इत्यादींचा धोका कमी करू शकता.
साखरेचे जास्त सेवन केल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढून हृदयाशी संबंधित अनेक आजार होतात.
जास्त साखर खाल्ल्यानेही लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. वास्तविक, साखरेमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. जास्त प्रमाणात गोडाचे सेवन केल्यास तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
जास्त साखर खाल्ल्याने शरीरात जळजळ होण्याची प्रक्रिया निर्माण होते. त्यामुळे त्वचेवर सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे पुढे सोरायसिस आणि एक्जिमासारख्या त्वचेच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.