श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपट 'स्त्री २' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. यावेळी धोका चंदेरीतील पुरुषांना नसून, चंदेरीतील महिलांना आहे. 'सरकटा'चा चित्रपटात सगळ्या महिलांना कैद करत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या चित्रपटात सरकटाची भूमिका कोणी केली आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सुनील कुमारने 'स्त्री २' मध्ये सरकटेची भूमिका साकारली आहे. सुनील कुमार हा जम्मूचा रहिवासी आहे.
सुनील कुमारच्या उंचीबद्दल बोलायचे, तर तो भारतीय कुस्तीपटू खलीपेक्षा उंच आहे. त्याची उंची ७ फूट ६ इंच आहे. सुनीलला 'द ग्रेट खली ऑफ जम्मू' असेही म्हटले जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील कुमार यांची जम्मू-काश्मीर पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली आहे. याशिवाय तो कुस्ती स्पर्धांमध्येही भाग घेतो.
सुनील कुमारला व्हॉलीबॉल आणि हँडबॉल खेळांची विशेष आवड आहे. याच खेळांमुळे सुनीलला स्पोर्ट्स कोट्यातून जम्मू-काश्मीर पोलिसात नोकरी मिळाली. सुनील २०१९मध्ये WWE ट्रायआउट्सचा एक भाग होता.
चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी सांगितले की, कास्टिंग टीमने सुनीलचा शोध घेतला होता. आम्हाला त्याच्यासारखाच उंचीचा कोणीतरी हवा होता, असे ते म्हणाले. कौशिकने सांगितले की, आम्ही त्याच्या बॉडी शॉट्सचा वापर केला आहे. त्याचबरोबर सरकटाचा चेहरा सीजीआयने बनवला आहे.