Horror Movies: घरात एकटे आहात? मग चुकूनही बघू नका ‘हे’ हॉरर चित्रपट! रात्री झोपतानाही वाटेल भीती-stree 2 bulbbul shaitaan to pari the horror and thriller films you must watch this weekend on ott ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Horror Movies: घरात एकटे आहात? मग चुकूनही बघू नका ‘हे’ हॉरर चित्रपट! रात्री झोपतानाही वाटेल भीती

Horror Movies: घरात एकटे आहात? मग चुकूनही बघू नका ‘हे’ हॉरर चित्रपट! रात्री झोपतानाही वाटेल भीती

Aug 18, 2024 09:46 AM IST
  • twitter
  • twitter
Most Horror Movies On OTT: जर तुम्ही 'स्त्री २' हा चित्रपट पाहिला असेल आणि त्यानंतर तुम्हाला हॉरर चित्रपट पाहावेसे वाटत असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास हॉरर चित्रपटांचा खजिना घेऊन आलो आहोत. तुम्ही हे चित्रपट ओटीटीवर पाहू शकता.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर चित्रपट 'स्त्री २' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री २' ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडून बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या चित्रपटातील दोन्ही स्टार्सच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. जर तुम्ही 'स्त्री २' पाहिला असेल आणि आता तुम्हाला आणखी काही हॉरर चित्रपट पाहावेसे वाटत असतील, तर आम्ही तुमच्यासाठी अशाच अनेक हॉरर चित्रपटांचा खजिना घेऊन आलो आहोत.
share
(1 / 7)

भानू प्रताप सिंग दिग्दर्शित 'भूत: पार्ट वन'मध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि आशुतोष राणा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एका अलौकिक शक्तीवर आधारित आहे. चित्रपटातील सस्पेन्स आणि धक्कादायक कथा बघून सगळेच भीतीने थरथर कापतील. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
share
(2 / 7)

हनी त्रेहान दिग्दर्शित ‘रात अकेली है’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय श्वेता त्रिपाठी, आदित्य श्रीवास्तव आणि निशांत दहिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. एका छोट्या शहरातील एका हाय-प्रोफाइल लग्नाच्या वेळी झालेल्या हत्येभोवती हा चित्रपट फिरतो. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
share
(3 / 7)

१८व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर ‘बुलबुल’ची कथा आधारित आहे. ही कथा एका हवेलीत राहणाऱ्या 'बुलबुल' (तृप्ती डिमरी) भोवती फिरते. या चित्रपटात अविनाश तिवारी, राहुल बोस आणि पाओली दाम यांच्या भूमिका आहेत. बुलबुल ही एक तरुण वधू आहे, जिच्या आयुष्याला एक भयानक वळण येते, जेव्हा तिच्या कुटुंबासोबत गूढ आणि हिंसक घटना घडू लागतात. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
share
(4 / 7)

कृष्णा भट्ट दिग्दर्शित, '१९२०: द टेरर ऑफ द हार्ट' विक्रम भट्ट निर्मित आहे. महेश भट्ट यांनी याची कथा लिहिली आहे. हा चित्रपट १९२०च्या सीरिजमधील पाचवा भाग आहे. यात अविका गौर आणि राहुल देव मुख्य भूमिकेत आहेत. तुम्ही हा चित्रपट हॉटस्टारवर पाहू शकता.
share
(5 / 7)

‘परी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केले असून, निर्मिती अनुष्का शर्माची आहे. या चित्रपटाची कथा रुखसाना नावाच्या मुलीभोवती फिरते, जिची भूमिका अनुष्का शर्माने केली आहे. रुखसाना अनेक विचित्र आणि भयानक घटनांना बळी पडते. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
share
(6 / 7)

'शैतान' हा २०२३मध्ये आलेल्या गुजराती चित्रपट 'वश'चा रिमेक आहे. या चित्रपटात अजय देवगण, आर माधवन, ज्योतिका आणि जानकी बोडीवालासारखे स्टार कलाकार आहेत. याची कथा एका कुटुंबाभोवती फिरते, ज्यावर एका वाईट व्यक्तीची नजर आहे. या चित्रपटात माधवनने एका सैतानाची भूमिका साकारली आहे, जो काळी जादू करून अजयच्या मुलीला आपल्या ताब्यात घेतो. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज