अभिनेता अभिषेक बॅनर्जीने 'स्त्री 2' आणि 'वेद' मध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. अभिषेक जितका चांगला अभिनेता आहे तितकाच तो कास्टिंग डायरेक्टर आहे.
अभिषेक हा कास्टिंग बे या कंपनीचा को-फाऊंडर आहे. त्याने द डर्टी पिक्चर, नो वन किल्ड जेसिका आणि द स्काय इज पिंक सारख्या चित्रपटांसाठी कास्टिंगचे काम केले आहे.
अलीकडेच, अभिषेक बॅनर्जीने एका मुलाखतीत सांगितले की त्याला करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या एका प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले होते. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने याचा खुलासा केला आहे.
अभिषेकने सांगितले की, ही घटना २०१२ मध्ये अग्निपथच्या रिमेकदरम्यान घडली होती. अग्निपथमध्ये हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसला होता. तर संजय दत्तने खलनायकाची भूमिका साकारली होती.
अभिषेकने सांगितले की, धर्मा प्रोडक्शनला चित्रपटासाठी त्याची निवड आवडली नाही. यामुळे त्याला प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले.
अभिषेकने सांगितले की त्याने आणलेले कलाकार अनुरन कश्यप शैलीतील कलाकार होते जे करण जोहरच्या चित्रपटासाठी योग्य नव्हते.