Actor Abhishek Banerjee: अभिनेता अभिषेक बॅनर्जी सध्या 'वेदा' आणि 'स्त्री २' मधील त्याच्या अभिनयामुळे चर्चेत आहे. दोन्ही चित्रपटांत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्याने सर्वांची मने जिंकली. आता करण जोहरने त्याला एका कामातून कसे काढून टाकले, हे त्याने सांगितले.
(1 / 7)
अभिनेता अभिषेक बॅनर्जीने 'स्त्री २' आणि 'वेदा' मध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. अभिषेक जितका चांगला अभिनेता आहे, तितकाच तो चांगला कास्टिंग डायरेक्टर आहे.
(2 / 7)
अभिषेक हा ‘कास्टिंग बे’सजा सह-संस्थापक आहे. त्याने ‘द डर्टी पिक्चर’, ‘नो वन किल्ड जेसिका’ आणि ‘द स्काय इज पिंक’सारख्या चित्रपटांसाठी कास्टिंग केले आहे.
(3 / 7)
अभिषेक बॅनर्जीने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, त्याला करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या एका प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले होते. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने याचा खुलासा केला आहे.
(4 / 7)
अभिषेकने सांगितले की, ही घटना २०१२मध्ये ‘अग्निपथ’च्या रिमेकदरम्यान घडली होती. ‘अग्निपथ’मध्ये हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसला होता. तर, संजय दत्तने खलनायकाची भूमिका साकारली होती.
(5 / 7)
अभिषेकने सांगितले की, धर्मा प्रोडक्शनला चित्रपटासाठी त्याने निवडलेले कलाकार आवडले नाहीत. यामुळे त्याला प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले होते.
(6 / 7)
अभिषेकने सांगितले की, त्याने निवडलेले कलाकार अनुराग कश्यप शैलीतील कलाकार होते, जे करण जोहरच्या चित्रपटासाठी त्याच्या दृष्टीकोनातून सुसंगत नव्हते.
(7 / 7)
अभिषेक बॅनर्जीने ‘स्त्री २’मध्ये जनाची भूमिका साकारली आहे. तो वरुण धवनसोबत ‘भेडिया’ या चित्रपटातही दिसला होता. याशिवाय अभिषेक ‘पाताल लोक’ या वेब सीरिजमध्येही दिसला होता. (All Photos: Instagram)