Storm Pia : युरोपात ख्रिसमसधी धामधूम सुरू असतांना एका शक्तिशाली चक्रीवादळाने वायव्य युरोपला धडक दिली आहे. या चक्रीवादळामुळे जणजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक ठिकाणी पुरस्थिती देखील निर्माण झाली आहे.
(1 / 6)
वायव्य युरोपात पिया चक्री वादळाने थैमान घातले आहे. रात्रभर आणि शुक्रवारी जोरदार वाहनाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी घरे कोसळली तर झाडे उन्मळून पडली. हवमान खात्याने उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर पुराचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे. (AFP)
(2 / 6)
बेल्जियममध्ये, एका महिलेला वादळी वाऱ्यामुळे ख्रिसमसचे झाड अंगावर पडल्याने गंभीर दुखापत झाली, तर नेदरलँड्समध्ये, झाड पडल्याने एक नागरीक ठार झाला. (REUTERS)
(3 / 6)
वादळी वाऱ्यांमुळे यू.के.च्या काही भागांमध्ये विमान सेवा बंद करण्यात आली होती. अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आले होते. येतील रेल्वे सेवा तसेच स्कॉटिश फेऱ्या देखील चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. (REUTERS)
(4 / 6)
डॅनिश हवामानशास्त्रज्ञांनी पिया वादळासह येणार्या धोकादायक हवामानाचा अंदाज वर्तवला आहे, वादळ डेन्मार्कला धडकले तेव्हा मोठ्या प्रमाणावर पुर येण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. (AFP)
(5 / 6)
राष्ट्रीय रेल्वे प्राधिकरणाने ड्यूश बान यांनी हॅम्बुर्ग आणि हॅनोव्हर ते फ्रँकफर्ट आणि म्युनिक या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद केली आहे. तसेच हॅम्बुर्ग ते उत्तरेकडील कील आणि फ्लेन्सबर्ग पर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
(6 / 6)
शुक्रवारी आल्बोर्ग बंदरावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पूर आला असून उत्तर जटलँड, डेन्मार्क येथे कार पाण्यात बुडाल्या आहेत.