Share Market : अचानक बंद झालं 'या' ५ शेअर्सचं ट्रेडिंग; काय होतं कारण आणि कोणत्या आहेत या कंपन्या?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Share Market : अचानक बंद झालं 'या' ५ शेअर्सचं ट्रेडिंग; काय होतं कारण आणि कोणत्या आहेत या कंपन्या?

Share Market : अचानक बंद झालं 'या' ५ शेअर्सचं ट्रेडिंग; काय होतं कारण आणि कोणत्या आहेत या कंपन्या?

Share Market : अचानक बंद झालं 'या' ५ शेअर्सचं ट्रेडिंग; काय होतं कारण आणि कोणत्या आहेत या कंपन्या?

Jan 08, 2025 05:39 PM IST
  • twitter
  • twitter
Stock Trading Halted News : शेअर बाजारात वेगवेगळ्या कारणांमुळं सातत्यानं चर्चेत असलेल्या काही शेअर्सचे व्यवहार सेबीनं थांबवले आहेत. कोणते आहेत हे शेअर पाहूया…
अस्थिरता हा शेअर बाजाराचा स्थायीभाव आहे. तिथं काहीही स्थिर नसतं. बाजारात सूचीबद्ध झालेल्या काही शेअर्सनी अल्पावधीतच लोकांना करोडपती बनवलं आहे, तर काहींनी कंगाल करून टाकलं आहे. आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे, परंतु आजकाल त्यांचे व्यवहार थांबवले गेले आहेत.
twitterfacebook
share
(1 / 5)

दिवाळखोरीचा सामना करणाऱ्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडची ट्रेडिंग सेबीनं ५ वर्षांसाठी थांबवली आहे. नियमबाह्य पद्धतीनं कंपनीतून निधी वळवल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीच्या शेअरचा शेवटचा भाव १.८८ रुपये आहे. या शेअरचा शेवटचा व्यवहार ६ जानेवारी रोजी झाला होता. पाच वर्षांत शेअरनं गुंतवणूकदारांना १२२ टक्के परतावा दिला आहे. 
twitterfacebook
share
(2 / 5)

भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडच्या शेअर्सचे व्यवहार सध्या बंद आहेत. त्याची शेवटची ट्रेडिंग किंमत १२३६.४५ रुपये होती. गेल्या महिन्यापासून त्याचा व्यवहार बंद आहे. कंपनीच्या शेअर्सनं वर्षभरात मल्टीबॅगर परतावा दिला होता. एका वर्षात कंपनीचे शेअर १० हजार टक्क्यांनी वाढले होते. कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला चुकीची माहिती देऊन शेअरच्या किंमतींमध्ये कृत्रिम फुगवटा आणला होता, असा कंपनीवर आरोप आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेडच्या शेअर्सचे शेवटचे व्यवहार गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी झाले होते. या दिवशी हा शेअर १०.२८ रुपयांवर बंद झाला. हा शेअर पाच वर्षांत २९५ टक्के वाढला. सलग दोन तिमाहीचे निकाल जाहीर न केल्यामुळं सेबीनं ही कारवाई केली आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कॅपिटलचा शेअरची ट्रेडिंग गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. या शेअरचा शेवटचा भाव ११.७९ रुपये आहे. ही कंपनी सध्या दिवाळखोरीचा सामना करत आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेपी इन्फ्राटेक लिमिटेडच्या शेअर्सचे व्यवहार सध्या बंद आहेत. त्याची शेवटची ट्रेडिंग प्राइस १.२७ रुपये आहे.
twitterfacebook
share
(6 / 5)

इतर गॅलरीज