'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. कला आणि अद्वैत हे मनाविरुद्ध गोष्टी करताना दिसत आहेत. कलाचे मंगळसूत्र तुटते. आबा अद्वैतला ते नवे आणण्यास सांगतात. अद्वैत नवे मंगळसूत्र कलाच्या गळ्यात सर्वांसमोर घालतात.
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत कला आणि अद्वैतच्या मनात लग्नाबाबत प्रश्न उभा राहिला आहे. अशात कलाने अद्वैतसाठी वटपौर्णिमेनिमित्त निर्जळी उपवास ठेवला आहे. ती अद्वैतसाठी उपवास करते. पण हे नातं किती टिकणार आहे असा प्रश्न कलाला पडला आहे.
अद्वैत कलाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि रुममध्ये निघून जातो. समोर काम असतानाही अद्वैत विचारात गुंतलेला असतो. त्यालाही प्रश्न पडतो की कलासोबतचे नाते हे नाते मनाविरुद्धचे आहे. त्यामुळे हे नेमकं काय सुरु आहे? दोघेही जबरदस्ती एकमेकांसोबत राहातो आहे. असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात येत आहेत.
आबा अद्वैतच्या खोलीमध्ये येतात तेव्हा तो विचारात असतो. आबा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की जे काही होतय ते चांगलं होत आहे. फक्त माझ्यावर थोडा विश्वास ठेव. आता अद्वैत काय विचार करणार हे पाहण्यासारखे आहे.
दुसरीकडे कला खोलीत आलेली असताना तिचा पदर अद्वैतच्या घड्याळात अडकतो. तो काढत असताना मंगळसूत्र अद्वैतच्या शर्टाच्या बटणात अडकते. तेवढ्यात सरोज तेथे येते आणि कलाला ऐकवते. जेवायला बसताना रोहिणीला तिचा भाऊ प्रदीपची आठवण येते. ती सरोजला टोमणा मारते आज प्रदीप दादाचा पत्ताही नाही. सरोज ते ऐकून चिडते. त्यावर रोहिणी स्पष्ट बोलते माझी माझ्या नवऱ्याला सोडून यायची हिंमत होती तुझी तिही नाही. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.