मराठी बातम्या / फोटोगॅलरी / /
Stampede in Yemen : धर्मादाय कार्यक्रमात येमेनमध्ये चेंगराचेंगरी; ८५ नागरिक ठार; पाहा फोटो
- Stampede in Yemen : यमनची राजधानी साना येथे जकात वाटण्याच्या कार्यक्रमा चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८५ लोकांचा मृत्यू झाला. तर ३२२ नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
- Stampede in Yemen : यमनची राजधानी साना येथे जकात वाटण्याच्या कार्यक्रमा चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८५ लोकांचा मृत्यू झाला. तर ३२२ नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
(1 / 7)
येमेनमधील धर्मादाय वितरण कार्यक्रमात गुरुवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे ८५ नागरिक ठार झाले तर शेकडो जखमी झाले. (via REUTERS)
(2 / 7)
ही घटना ईद अल-फितर या सणाच्या काही दिवस आधी घडली. हा दिवस रमजानचा महिना संपला म्हणून मेजवानी देऊन जगभरात साजरा केला जातो. (REUTERS)
(3 / 7)
श्रीमंत उद्योगपतींकडून ५ हजार येमेनी रियालचे वापट करण्यात येत होते. हे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गरीब लोक राजधानी साना येथील शाळेत जमले होते. (AP)
(4 / 7)
यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. राजधानीच्या बाब अल-येमेन जिल्ह्यात झालेल्या ही दुर्दैवी घटना घडली. यात ८५ नागरिक ठार आणि ३२२ हून अधिक सामान्य नागरिक जखमी झाले. (AP)
(5 / 7)
साक्षीदारांनी सांगितले की सशस्त्र हुथींनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात हवेत गोळीबार केला. परंतु गोळी ही विजेच्या तारेला धडकली. यामुळे स्फोट होऊन आगीचे लोळ खाली पडले. (via REUTERS)
(6 / 7)
आगीचे लोळ खाली पडल्याने उपस्थित नगरिकांमध्ये घबराट पसरली. यामुळे अनेक महिला आणि मुलांसह लोक पळू लागल्याने चेंगराचेंगरी झाली. (via REUTERS)
इतर गॅलरीज