(1 / 5)कपड्यांवरील डाग असामान्य नाहीत. हट्टी डाग दूर करण्यासाठी वॉशिंग मशिन प्रभावी नसतात, विशेषत: कॉफी, चहा, मटनाचा रस्सा इत्यादी डाग इतक्या लवकर दूर होत नाहीत. काही डाग हाताने चोळून काढता येत नाहीत. असे डाग दूर करण्यासाठी काही खास टिप्स फॉलो करायला हव्यात.