राज्य एसटी महामंडळातील ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सुमारे ९० आगारात एलएनजी वितरण केंद्रही उभारण्यात येणार आहे.
सध्या महामंडळाकडे डिझेलवर चालणारी सुमारे १६००० प्रवासी वाहने असून एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर म्हणजेच डिझेलवर केला जातो.
डिझेलच्या दरात वारंवार होणारी वाढ लक्षात घेता व हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी पर्यायी इंधन वापरणे काळाची गरज बनली आहे. या प्रकल्पांतर्गत टप्प्याटप्प्याने पूर्ण एस.टी महामंडळातील वाहने एलएनजी इंधनावर आधारित करण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने एलएनजी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी मे. किंग्स् गॅस प्रा. लि. कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामध्ये परिवहनासाठी देखील एलएनजीचा वापर व पुरवठा करण्यात येणार आहे.