मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Asia Cup 2022 : कोण होणार आशियाचा बादशाह?, श्रीलका-पाकिस्तान आज फायनलमध्ये भिडणार

Asia Cup 2022 : कोण होणार आशियाचा बादशाह?, श्रीलका-पाकिस्तान आज फायनलमध्ये भिडणार

Sep 11, 2022 05:40 AM IST HT Marathi Desk
  • twitter
  • twitter

  • Asia cup final 2022 : आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे. पाकिस्तानसमोर आतापर्यंत अपराजित राहिलेल्या श्रीलंकेचं आव्हान असेल.

Asia cup final 2022 : संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज पाकिस्तान आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजेपासून सामन्याला सुरुवात होईल.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Asia cup final 2022 : संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज पाकिस्तान आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजेपासून सामन्याला सुरुवात होईल.(AP)

आशिया कप स्पर्धेत सुपर ४ च्या सामन्यांत श्रीलंकेनं एकही सामना गमावलेला नाही. याशिवाय त्यांनी मागच्याच सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यामुळं आता फायनलमध्येही श्रीलंकेचंच पारडं जड असणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

आशिया कप स्पर्धेत सुपर ४ च्या सामन्यांत श्रीलंकेनं एकही सामना गमावलेला नाही. याशिवाय त्यांनी मागच्याच सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यामुळं आता फायनलमध्येही श्रीलंकेचंच पारडं जड असणार आहे.(AP)

भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरोधात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल केली होती. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या अनुपस्थितीत पाकिस्तानच्या गोलंदाजीची धुरा नसीम शाह, हारिस रऊफ आणि हसन अली यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरोधात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल केली होती. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या अनुपस्थितीत पाकिस्तानच्या गोलंदाजीची धुरा नसीम शाह, हारिस रऊफ आणि हसन अली यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.(AP)

त्याचबरोबर श्रीलंकेकडेही चमिका करुणारत्ने, चरिथ असालंका आणि वनिंदु हसरंगा यांच्यासारखे पहिल्या काही षटकांतच विकेट घेऊन देणारे गोलंदाज आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

त्याचबरोबर श्रीलंकेकडेही चमिका करुणारत्ने, चरिथ असालंका आणि वनिंदु हसरंगा यांच्यासारखे पहिल्या काही षटकांतच विकेट घेऊन देणारे गोलंदाज आहेत.(AP)

वनिंदु हसरंगा हा फिरकीपटू असून तो मधल्या काही षटकांमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी डोकेदुखील ठरू शकतो. याशिवाय तो अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करण्यातही माहिर आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

वनिंदु हसरंगा हा फिरकीपटू असून तो मधल्या काही षटकांमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी डोकेदुखील ठरू शकतो. याशिवाय तो अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करण्यातही माहिर आहे.(AP)

पाकिस्तानच्या फलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास संपूर्ण आशिया कपमध्ये कर्णधार बाबर आझम आणि फखर झमानच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत. सलामीवीर मोहम्मद रिझवान, मधल्या फळीत इफ्तीखार अहमद आणि मोहम्मद नवाझ यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. त्यामुळं या सामन्यात दोन्ही संघ आशिया कपवर आपलं नाव कोरण्यासाठी आमने-सामने येणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

पाकिस्तानच्या फलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास संपूर्ण आशिया कपमध्ये कर्णधार बाबर आझम आणि फखर झमानच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत. सलामीवीर मोहम्मद रिझवान, मधल्या फळीत इफ्तीखार अहमद आणि मोहम्मद नवाझ यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. त्यामुळं या सामन्यात दोन्ही संघ आशिया कपवर आपलं नाव कोरण्यासाठी आमने-सामने येणार आहेत.(AP)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज