मराठी बातम्या / फोटोगॅलरी / IPL 2022: पाहा गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स सामन्याची छायाचित्रे
IPL 2022: पाहा गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स सामन्याची छायाचित्रे
IPL 2022: पाहा गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स सामन्याची छायाचित्रे
May 07, 2022 08:01 AM IST
IPL 2022: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने गुजरातवर मात केली.
(1 / 9)
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात गुजरातच्या राहुल तेवतियाची विकेट काढल्यानंतर आनंद साजरा करताना मुंबई इंडियन्सचे खेळाडू.(PTI)
(2 / 9)
मुंबईचे आघाडीचे फलंजदाज इशान किशन आणि रोहित शर्मा. या दोघांनी शुक्रवारी गुजरातच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. रोहित शर्मा फॉर्ममध्ये येत असल्याचं संकेतही या सामन्यात पाहायला मिळाले.(PTI)
(3 / 9)
मुंबईच्या कप्तानानं शुक्रवारी गुजरातविरुद्धच्या सामन्यात मुक्त हस्ताने फलंदाजी केली. रोहित शर्माने आपल्याला पुन्हा एकदा सूर गवसत असल्याचं दाखवून दिलं.(PTI)
(4 / 9)
राशिद खानने मुंबईच्या कायरन पोलार्डला बाद केलं तो क्षण. राशिद खानने कायरन पोलार्डला एकाच टप्प्यावर तीन चेंडू टाकले.(PTI)
(5 / 9)
गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलनं अर्धशतक साजरं केलं. गेल्या काही सामन्यात गिलही धावांसाठी झगडत होता.(PTI)
(6 / 9)
शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी मुंबईचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला केला. या दोघांच्या फलंदाजीनं गुजरातच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या.(PTI)
(7 / 9)
वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी जोरदार फटकेबाजी केली. या दोघांच्या भागिदारीदरम्यानचा एक क्षण.(PTI)
(8 / 9)
मुंबईचा गोलंदाज मुरुगन अश्विन आनंद साजरा करताना. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईनं गुजरातवर पाच धावांनी विजय मिळवला.(ANI)