Spiritual Temples in India: भारत हा देश जगभरात 'मंदिरांची भूमी' म्हणून ओळखला जातो. भारतात शेकडो मंदिरे आहेत. तुम्हाला तर भारतातील काही मंदिरांना भेट द्यायची असेल तर या ७ मंदिरांमध्ये नक्की जा..
(1 / 7)
भारत ही संस्कृती आणि परंपरेची भूमी आहे. हिंदु राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतामध्ये लाखो मंदिरे आहेत. पण भारतातील काही मंदिरे ही जगप्रसिद्ध आहेत. त्यामध्ये कोणत्या मंदिरांचा समावेश हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तुम्ही जर देवाचे भक्त असाल तर आयुष्यात एकदा तरी या मंदिरांना भेट द्या.
(2 / 7)
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील जुन्या गल्लीजवळ असलेले काशी विश्वनाथ हे मंदिर प्रसिद्ध आहे. ज्या व्यक्तींनी आयुष्यात सत्कर्म केली आहेत तेच फक्त काशीला जाऊ शकतात असे म्हटले जायचे. काशी विश्वनाथ मंदिर हे गंगा नदीच्या काठी आहे.
(3 / 7)
ओडिसा राज्यातील पुरी जगन्नाथ मंदिर हे प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराची दरवर्षी रथयात्रा निघते. जगभरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात.
(4 / 7)
मुंबईतील प्रभादेवी येथे असलेले सिद्धीविनायक मंदिर हे जगभरात ओळखले जाते. या मंदिरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार, दिग्गज मंडळी येत असतात. हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
(5 / 7)
हिंदूंच्या पवित्र मंदिरांपैकी एक असलेले मंदिर म्हणजे वैष्णो देवी मंदिर. जम्मूमधील हे मंदिर अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे. दरवर्षी लाखो भाविक वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात.
(6 / 7)
भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी सोमनाथ मंदिर हे एक आहे. गुजरातमध्ये असलेल्या या मंदिराची वास्तुकला अप्रतिम आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेले हे मंदिर भगवान चंद्राला समर्पित केलेले आहे. भारतातील १२ जोतिर्लिंगांपैकी एक हे मंदिर आहे.
(7 / 7)
केदारनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिरांपैकी एक आहे. उत्तराखंड राज्यातील केदारनाथ शहरात हे मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून ३५८३ मीटर उंचीवर हे मंदिर आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात मंदिर भावीकांसाठी खुले असते.
(8 / 7)
केरळमधील तिरुवनंतपुरम येथे पद्मनाभस्वामी मंदिर आहे. हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर मानले जाते.