बहुतांश वेळा कामाच्या व्यापात महिनाभर घराच्या भिंती स्वच्छ न केल्यास घर अस्वच्छ दिसू लागते. शिवाय घरात कोळ्याचे जाळे निर्माण होतात. घराच्या भिंती आणि खिडक्यांवर बनलेल्या कोळ्याच्या जाळ्यांमुळे घर खूप अस्वच्छ दिसू लागते. लांब लटकणारी जाळी घराचे सौंदर्यच तर बिघडवतेच शिवाय नकारात्मक वातावरणसुद्धा निर्माण करते.
(Pixel)त्यामुळेच जर तुमच्या घरात कोळ्याचे जाळे वारंवार दिसत असतील, तर समजून जा की, तुमच्या घरात साफसफाईच्या अनियमिततेमुळे कोळींचे प्रमाण वाढेल आहे. परंतु काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची कोळी आणि त्याच्या जाळ्यायापासून लगेचच सुटका होईल.
तुम्हालाही तुमच्या घरातून कोळ्याचे जाळे साफ करायचे असतील, तर तुम्हाला आधी कोळी शोधावी लागेल. जाळे साफ करताना, त्यात कोळी आहे की नाही याची खात्री करा. अथवा कोळी दुसरीकडे कुठेतरी लपून बसेल. आणि पुन्हा जाळे बनवण्यास सुरुवात करेल. कोळीना मारण्यासाठी बाजारात औषधे उपलब्ध आहेत. ते शिंपडा जेणेकरून ते पुन्हा घरात दिसणार नाहीत.
कोळ्याचे जाळे कमी करण्यासाठी, आधी तुम्हाला कोळीपासून मुक्ती मिळवावी लागेल. त्यासाठी तुम्ही पेपरमिंट ऑइल घरात फवारू शकता. ते ऑइल पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरून ठेवा. आणि जिथे कोळी दिसेल तिथे त्याची फवारणी करा.
तंबाखूच्या वासानेही कोळी पळून जातात. खोलीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात तंबाखू ठेवल्यास त्याच्या उग्र वासामुळे घराच्या भिंती आणि खिडक्यांवर कोळी पुन्हा दिसणार नाहीत. तसेच लिंबू आणि संत्र्याची सालेही खोलीत ठेवू शकता. त्याच्या तीव्र वासामुळे इतर किडेही पळून जातात.
(pixel)
तसेच लिंबाचा रस एका बाटलीत ठेवा. जिथे कोळ्याचे जाळे दिसतील तिथे त्याची फवारणी करा. जाळे बनवण्यासाठी कोळी पुन्हा त्याठिकाणी येणार नाही.