Dagdusheth Ganpati : गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात फुलांची खास सजावट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी, PHOTOS-special decoration of dagdusheth halwai ganesh temple on occasion of ganesh jayanti crowd of devotees ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Dagdusheth Ganpati : गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात फुलांची खास सजावट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी, PHOTOS

Dagdusheth Ganpati : गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात फुलांची खास सजावट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी, PHOTOS

Feb 13, 2024 06:54 PM IST
  • twitter
  • twitter
Dagdusheth Halwai Temple Ganesh Jayanti : दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त खास सजावट करण्यात आली होती. गणेश दर्शनासाठी भविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली होती. मंदिरात पाहटे पासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. मंदिरात केलेल्या मनोहारी सजावटीचे दृश्य डोळ्यात साठविण्यासोबतच शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेतले.
share
(1 / 6)

वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे.. अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशात महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. यंदा देखील विविध शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात श्री गणेशजन्म सोहळा उत्साहात पार पडला.
share
(2 / 6)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने श्री गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई आणि बाल गणेशाची रूपे पुष्पसजावटीमध्ये साकारण्यात आली होती.
share
(3 / 6)

मंगळवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक आणि त्यानंतर पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत किराणा घराण्याच्या गायिका विदुषी पद्मा देशपांडे यांनी स्वराभिषेकातून श्रीं च्या चरणी गायनसेवा अर्पण केली. सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ यावेळेत गणपती सूक्त अभिषेक देखील झाले.
share
(4 / 6)

सायंकाळच्या सुमारास श्रीं ची पालखीतून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बँड आदी सहभागी झाले होते. 
share
(5 / 6)

दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर रामेश्वर चौक- टिळक पुतळा मंडई - कोतवाल चावडी - बेलबाग चौक- लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक - नू.म.वि. प्रशाला अप्पा बळवंत चौक - तांबडी जोगेश्वरी मंदिर या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज