बॉलिवूडमध्ये साऊथ चित्रपटांची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. जेव्हा बॉलीवूडमध्ये सिनेमांमध्ये सतत तेच तेच दाखवू लागले आणि चित्रपटांचा दर्जा कमी झाला तेव्हा लोक दक्षिणेकडे वळले. आता दिवाळीच्या सुट्टीत जर तुम्हाला सिनेमा पाहायचा असेल तर IMDbवर चांगले रेटिंग असलेले हे सिनेमा पाहा
थलपथी विजयची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे आणि त्याचा 'कैथी' हा चित्रपट सर्वाधिक IMDb रेटिंग असलेल्या चित्रपटांच्या यादीत 5 व्या क्रमांकावर आहे. पळून गेलेला गुन्हेगार एका मोठ्या कंपनीच्या संपर्कात येतो ज्याला गावाची जमीन ताब्यात घ्यायची आहे. मग एक आश्चर्यकारक युद्ध सुरू होते.
आता या यादीत नंबर दोन आणि पहिल्या क्रमांकावर असलेल्या चित्रपटांकडे येऊ. याचा अंदाज तुम्हाला आत्तापर्यंत आला असेल. एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली - द कन्क्लुजन' हा चित्रपट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याला IMDb वर 8.2 रेटिंग मिळाले आहे.