डिलिव्हरी बॉयने चोरले ग्राहकाचे बूट, बचावासाठी सोनू सूद याने केली पोस्ट आणि झाला ट्रोल
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  डिलिव्हरी बॉयने चोरले ग्राहकाचे बूट, बचावासाठी सोनू सूद याने केली पोस्ट आणि झाला ट्रोल

डिलिव्हरी बॉयने चोरले ग्राहकाचे बूट, बचावासाठी सोनू सूद याने केली पोस्ट आणि झाला ट्रोल

डिलिव्हरी बॉयने चोरले ग्राहकाचे बूट, बचावासाठी सोनू सूद याने केली पोस्ट आणि झाला ट्रोल

Apr 13, 2024 02:39 PM IST
  • twitter
  • twitter
  • बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या चर्चेत आहे. या चर्चा त्याने डिलिव्हरी बॉयसाठी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे रंगल्या आहेत. या पोस्टमुळे तो ट्रोल देखील झाला आहे.
भारतीय सुपरहिरो म्हणून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ओळखला जातो. सर्वसामान्य माणसे मदतीसाठी कायमच सोनू सूदकडे हात पसरतात. अभिनेता देखील त्याला शक्य होईल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. सोनू सूद खास करुन सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत करताना दिसतो. पण सध्या सोनू सूदने एका डिलिव्हरी बॉयसाठी घेतलेल्या भूमिकेमुळे ट्रोल होताना दिसत आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

सोशल मीडियावर दिल्लीतील गुरुग्राम येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉयने चक्क घरातून ब्रँडेड शूज चोरी केल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. (Photo by Sujit JAISWAL / AFP)
twitterfacebook
share
(2 / 5)

(AFP)
अनेकांनी सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयच्या कृत्याबद्दल टीका केली आणि कंपनीला त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले. पण अभिनेता सोनू सूद मात्र त्याच्या बचावासाठी उतरला. त्या डिलीव्हरी बॉयला नव्या चपला भेट द्यायला हव्या होत्या अशी पोस्ट त्याने लिहिली.
twitterfacebook
share
(3 / 5)

सोनू सूदने एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर "त्या डिलिव्हरी बॉयने एखाद्याच्या घरी डिलीव्हरी करताना शूजची एक जोडी चोरली तर त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नका. त्याला नवीन चप्पल खरेदी करुन द्या. त्याला खरी गरज असू शकतो. दयाळू व्हा" या आशयाची पोस्ट केली
twitterfacebook
share
(4 / 5)

सोशल मीडियावर सोनू सूदची ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी त्याला चांगलेच सुनावले. तू चुकीच्या लोकांची मदत करत आहेस असे अनेकांनी म्हटले.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज