Sonam Kapoor Elegant Look: सोनम कपूर प्राचीन बनारसी साडीचा ड्रेस परिधान करून अतिशय सुंदर आणि एलीगंट दिसत होती.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर पती आनंद आहुजासोबत तिच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात सहभागी झाली होती. या लग्नात सोनम कपूर प्राचीन बनारसी साडीचा ड्रेस परिधान करून अतिशय सुंदर आणि एलीगंट दिसत होती. (Instagram)
(2 / 5)
सोनम कपूर आणि आनंद आहुजा नुकतेच एका मैत्रिणीच्या लग्नात सहभागी झाले होते. यावेळचे खास फोटो सोनमने शेअर केले आहेत. या लग्नात सोनमने बनारसी साडीचा सुंदर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तिने पतीसोबतचे क्युट फोटो पोस्ट केले आहेत.(Instagram)
(3 / 5)
सोनमचा ड्रेस डिझायनर जिग्या पटेलने डिझाइन केला होता. सोनम कपूरला हा ड्रेस परिधान करून खूप आनंद झाला आहे. ती म्हणाली, ‘मला भारतीय कपडे घालायला आवडतात. आता ही बनारसी साडी नेसून पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे.’ (Instagram)
(4 / 5)
सोनम कपूरच्या या ड्रेसमध्ये मोती आणि विंटेज टॅसेल्स जोडलेले आहेत. तिच्या या दुपट्ट्यावर ६० वर्षांहून अधिक जुन्या मोची वर्क पीसने भरतकाम केलेले आहे. (Instagram)
(5 / 5)
सोनमने या ड्रेसवर चांदीचे दागिने परिधान केले आहेत. सोनमने घातलेल्या बांगड्या आणि पैंजण ८०-९० वर्षांपेक्षा जुने आहेत. सोनमचा हा ड्रेस लाल, निळा, हिरवा, सोनेरी, जांभळा, गुलाबी, नारंगी अशा अनेक रंगांच्या पॅलेटमध्ये सेट आहे. (Instagram)