मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेकदा तिच्या खासगी आयुष्याविषयी देखील चर्चा रंगताना दिसते.
नुकताच सोनालीने तिच्याविषयी सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देत खासगी आयुष्यावर पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे.
सोनालीने जयंती वाघधरेच्या 'पटलं तर घ्या' या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी ती म्हणाली की, ‘माझे एका राजकारण्यासोबत लग्न झाले आहे, अशी अफवा पसरली होती. त्यांनी मला राहायला घर दिले. जेव्हा ही अफवा पसरली होती, तेव्हा मला अनेकांचे फोन आले. माझ्या चुलत बहिणीने देखील मला फोन करुन विचारले की काय तुझे लग्न झाले का?’
पुढे सोनाली खुलासा करत सोनाली म्हणाली की, “मी तिला म्हटले की, अगं माझ लग्न झाले तर मी तुला लग्नाला बोलवेन. बहिण आहेस माझी तू, तेव्हा ती म्हणाली होती अगं होऊ शकते. पण असे कधीच काहीच नव्हते. या निव्वळ चर्चा होत्या.”