बॉलिवूड कलाकारांच्या लग्नाची जेवढी चर्चा रंगलेली असते तेवढीच त्यांच्या हनीमूनच्या फोटोची देखील चर्चा होते. नुकतेच लग्न झालेले सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचे हनीमूनचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यापूर्वी लग्न झालेल्या इतर कलाकारांचे देखील फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. चला पाहूया हे फोटो…
(Instagram)सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल मुंबईत लग्नसमारंभानंतर हनीमून एन्जॉय करत आहेत. सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये हे कपल सूर्यास्ताचा आनंद घेताना, पूलमध्ये पोहताना आणि डेट नाईटवर गेल्याचे पाहायला मिळाले.
(Instagram)एका उंच इमारतीच्या पुलमध्ये मजा करतानाचा फोटो सोनाक्षीने शेअर केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(Instagram)अनुष्का शर्मा आणि विराट कोहली रोममध्ये लग्न बंधनात अडकल्यानंतर रोमँटिक हनीमूनसाठी फिनलँडला गेले होते. काळ्या रंगाचे हिवाळी कपडे दोघांनी परिधान केले होते. बर्फाच्छादित झाडांनी वेढलेला सेल्फी त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
(Instagram)प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हनीमूनसाठी कॅरेबियनला गेले होते. या जोडप्याने त्यांच्या ग्रँड वेडिंगनंतर एका महिन्यानंतर हनीमूनचे आयोजन केले होते.
(Instagram)कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे लग्न केले. या जोडप्याने मालदीवमधील हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
(Instagram)विघ्नेश शिवन आणि अभिनेत्री नयनतारा हनीमूनसाठी थायलंडला गेले होते. त्यांचे तेथील फोटो चर्चेत होते.
(Instagram)परिणीती चोप्रा आणि तिचा पती-राजकारणी राघव चड्ढा यांचा विवाह सोहळा पार पडला. हनीमूनसाठी हे कपल मालदीवला गेले होते.
(Instagram)