Sonakshi Sinha Egypt Vacation: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिची इजिप्त टूर एन्जॉय करत आहे. या ट्रिपचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
(1 / 5)
सोनाक्षी सिन्हाने यावेळी भर वाळवंटात फोटोशूट केले आहे. तिच्या मागे उंटाची झलक देखील दिसत आहे. रणरणत्या उन्हात काळे कपडे परिधान करून सोनाक्षीने हटके फोटो पोज दिल्या आहेत.
(2 / 5)
इजिप्तची प्रेक्षणीय स्थळ फिरताना सोनाक्षी सिन्हा हिने पांढऱ्या रंगाचा ट्रेडीशनल आउटफिट परिधान केला आहे. काळा गॉगल लावून ती उन्हात इजिप्तची झलक दाखवताना दिसली आहे.
(3 / 5)
सोनाक्षी सिन्हाने गिझाच्या पिरॅमिडला भेट देताना एक छान फोटो क्लिक केला आहे. या फोटोत तिने घोड्यावर बसून, तो घोडा हवेत उधळला आहे. या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(4 / 5)
यावेळी सोनाक्षी सिन्हाने इजिप्तमधील प्रसिद्ध स्पिंक्ससोबत देखील भन्नाट पोज देत फोटोशूट केलं आहे. यावेळी सोनाक्षी सिन्हाने आपला गॉगल स्पिंक्ससमोर धरला आहे.
(5 / 5)
(6 / 5)
सोनाक्षी सिन्हा हिने इतर पर्यटकांप्रमाणेच भन्नाट पोज देत फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा स्पिंक्सला किस देतानाची पोज देताना दिसली आहे.