सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या आंतरजातीय विवाहाबाबत अनेक गॉसिप सुरू आहेत. मात्र, आम्ही एकमेकांपेक्षा वेगळे नाही, असे या दोघांचेही मत आहे. आयुष्यात एक चांगलं माणूस होणं महत्त्वाचं आहे, असे दोघेही म्हणत आहेत. एका मुलाखतीदरम्यान सोनाक्षी आणि झहीरने आपापली मतं व्यक्त केली आहेत.
(Sunil Khandare)एका मुलाखतीत सोनाक्षीला विचारण्यात आले की, ती आणि झहीर आपल्या पुढील आयुष्यात एकमेकांसोबत राहत असताना नेमक्या कोणत्या संस्कृती आणि परंपरा पाळतील? यावर सोनाक्षी म्हणाली की, ‘मला वाटतं आमचं नातं खूप सुंदर आहे. खरं सांगायचं, तर आम्ही एकमेकांपासून फारसे वेगळे नाही. सर्व काही आमच्यात ठरलेलं आहे.’
(Sunil Khandare)सोनाक्षीने मुलाखतीत पुढे म्हटले की, ‘आमच्या आई-वडिलांनी आम्हाला चांगले माणूस बनायला आणि देवावर विश्वास ठेवण्यास शिकवले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक चांगलं माणूस होणं. गरजेचं आहे. आपल्याकडे हीच संस्कृती आहे.’
(Sunil Khandare)झहीर म्हणाला की, ‘मला एक गोष्ट माहित आहे, मी आणि सोना ५० गोष्टींवर असहमत असू शकतो, परंतु, आमच्यात कधीही धर्म आडवा येणार नाही.’ झहीर म्हणाला की, सलीम काकांनी (सलमानचे वडील सलीम खान) एकदा मला लग्नाच्या वेळी सलमा आंटीच्या आई-वडिलांना हीच गोष्ट सांगितली होती.
(PTI)सोनाक्षी म्हणाली की, ‘सात वर्षांच्या डेटिंगमध्ये आमचे वेगवेगळे धर्म आमच्या बोलण्यातही कधीच आले नाहीत. आम्ही दोघेही एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. हा कधीच चर्चेचा विषय राहिलेला नाही. ही सगळी चर्चा बाहेरच्या लोकांकडून झाली आणि ती कशी संपवायची हे आम्हाला माहित आहे.’
(PTI)