सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल २३ जूनला लग्नबंधनात अडकणार आहेत. अभिनेत्रीच्या घरी लग्नाचे फंक्शनही सुरू झाले आहेत. २० जूनला हळदी समारंभानंतर २१ जूनला सोनाक्षीचा मेहंदी सोहळा पार पडला आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या मेहंदी सेरेमनीचे काही फोटो समोर आले आहेत. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचा मित्र जफर अली मुन्शी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या जोडप्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
सोनाक्षी आणि झहीरच्या मेहंदी सोहळ्याला त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. फॅशन डिझायनर किरण गुप्तानेही सोनाक्षीच्या मेहंदी सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचे मित्र जफर अली मुन्शी, रिंकी बजाज आणि किरण गुप्ता दिसत आहेत.
झहीर इक्बालची बहीण सनम रतनसीनेही तिचा भाऊ आणि सोनाक्षीच्या मेहंदी फंक्शनचे काही फोटो पुन्हा पोस्ट केले आहेत. एका फोटोत सनम रतनसी तिच्या गर्ल गँगसोबत दिसली आहे. या फोटोमध्ये किरण गुप्ता, पूजा गुप्ता, रिंकी बजाज आणि सनम दिसत आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या मैत्रिणीही हाताला मेंदी लावत आहेत. हातात मेंदी लावल्याचे फोटो समोर आले आहे. या फोटोत एक हात सोनाक्षी आणि झहीरचा मित्र जफर अली मुन्शी यांचा आहे.
सोनाक्षी सिन्हा तिच्या मेहेदी सेरेमनीत लाल रंगाचा ड्रेस परिधान करून दिसली आहे. तर, झहीर इक्बाल फ्लोरल कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. ही जोडी आपल्या कुटुंबासोबत पोज देताना दिसली आहे.