बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचा विवाहसोहळा २३ जून रोजी पार पडला. त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. त्यानंतर दादरमधील बॅस्टिन या शिल्पा शेट्टीच्या हॉटेलमध्ये त्यांनी रिसेप्शन ठेवले होते. त्यांच्या या रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. त्यावेळी त्या कलाकारांनी काय परिधान केले होते चला जाणून घेऊया…
(HT Photo/Varinder Chawla)सोनाक्षी आणि जहीरने रिसेप्शनला पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. सोनाक्षीने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर हिरव्या रंगाचा डायमंडचा हार, कानात झुमके,सिंदूर, हातात लाल बांगड्या घातला आहेत. तर जहीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे.
(HT Photo/Varinder Chawla)सोनाक्षीचे वडील शस्त्रूघ्न सिन्हा यांनी निळ्या रंगाचा कुर्ता, धोती पँट आणि त्यावर मॅचिंग शॉल घेतली आहे. सोनाक्षीची आई पूनम यांनी मोती कलरचा सिल्क ड्रेस घातला आहे.
(HT Photo/Varinder Chawla)सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाच्या रिसेप्शनला अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थही उपस्थित होते. अदितीने सुंदर गुलाब्या फुलांचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. तर सिद्धार्थने भरत काम असलेला बंदगळा जॅकेट घातले आहे.
(HT Photo/Varinder Chawla)सोनाक्षीच्या लग्नात काजोलने देखील हजेरी लावली. तिने सिल्कची साडी नेसली आहे.
(HT Photo/Varinder Chawla)रेखा यांनी सोनाक्षीच्या रिसेप्शनला पांढरा कुर्ता, त्यावर गोल्डन साडी नेसली आहे. तसेच गळ्यात हिरव्या रंगाचा नेकलेस घातला आहे. या लूकमध्ये रेखा अतिशय सुंदर दिसत आहे.
(HT Photo/Varinder Chawla)