हिंदू धर्मात दरवर्षी वर्षअखेरच्या अमावास्येला सोमवती अमावस्या येते. ही अमावस्या सोमवारी येते म्हणून तिला सोमवती अमावस्या म्हणतात. या विशिष्ट तिथीला अमावस्येला सूर्यग्रहण होते. हा दुर्लभ संयोग अनेक राशींना लाभ देणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या.
सोमवार ८ एप्रिल रोजी पहाटे ३.११ पासून अमावस्या सुरू होईल. आणि अमावस्या रात्री ११:५० वाजता संपेल. सूर्यग्रहण रात्री ९.१२ वाजता सुरू होईल आणि दुपारी २.२२ वाजता समाप्त होईल. या अमावास्येदरम्यान सूर्यग्रहणाचा परिणाम म्हणून, अनेक राशीच्या लोकांना हा काळ लाभाचा ठरणार आहे. बघूया, कोण-कोणात्या राशीच्या लोकांना फायदा होतोय.
वृषभ:
सोमवती अमावस्या वृषभ राशीच्या लोकांचे भाग्य वृद्धी करेल. करिअरमध्ये सकारात्मक अनुभव येईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुम्हाला ऐशोआराम मिळेल. सुख येईल. आयात वाढेल. सर्व अडथळे दूर होतील. तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील. तुम्हाला यश मिळेल.
कन्या :
सोमवती अमावस्येला शुभ योगात कन्या राशीला लाभ मिळेल, फायदा होईल. विवाह योग तयार होतील. प्रेम संबंध चांगले राहतील. तुम्हाला आवडेल तशी संपत्ती येत राहील. नोकरदारांना बढती मिळेल.
तूळ :
व्यवसायाचा विस्तार होईल. संपत्ती सुधारण्याचा मार्ग मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. काही मालमत्ता पूर्वजांकडून वारशाने मिळतील. संततीबद्दल एखादी चांगली बातमी मिळेल.