हिंदूं धर्मामध्ये अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात. या वेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे, म्हणून त्याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने या दिवसाचे महत्व अधिकच वाढले आहे.
((छायाचित्र सौजन्य पिक्साबे))महाराष्ट्रामध्ये हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो, या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि या सणाला पोळा म्हणतात. तामिळनाडूमध्ये हा दिवस अवनी अमावस्या म्हणून ओळखला जातो. मारवाडी समाजात हा दिवस भादो अमावस्या किंवा वाडी अमावस्या म्हणून साजरा केला जातो. यावर्षी २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्या आहे.
सोमवती अमावस्या सोमवार, २ सप्टेंबर २०२४ रोजी आहे. ही श्रावण महिन्यातील अमावस्या असेल. असे मानले जाते की, या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. असे केल्याने जीवनातील सर्व दु:खे दूर होतात.
सोमवती अमावस्या २०२४ मुहूर्त :
श्रावण महिन्याची अमावस्या २ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे ५ वाजून २१ मिनिटांनी सुरू होणार आहे. तर मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०७ वाजून २४ मिनिटांनी अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे.
सोमवती अमावास्येला काय करावे, सोमवती अमावस्येला पूजा कशी करावी तसेच कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबात सुख-शांती आणि समृद्धी नांदेल हे जाणून घ्या.
सोमवती अमावस्येला साखर, पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना खायला द्यावेत.
सोमवती अमावस्येला पिंपळ, वड, केळी, तुळस यांसारख्या वनस्पतींची लागवड करायची, कारण या झाडांमध्ये देवतांचा वास असल्याचे मानले जाते .
पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावे भात, डाळ, भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे. एक तांब्यात दूध, पाणी, पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे. पिठोरी अमावस्येत पितरांना नैवेद्य दाखविल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते.
सोमवती अमावस्येचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सोमवती अमावस्येला केलेली ही कर्मे पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात, असे मानले जाते.
सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो आणि हा श्रावण सोमवार असल्यामुळे खास मानला जात आहे. या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा.
(Freepik)यादिवशी भगवान शंकराला शिवामूठ म्हणून सातू वाहावी आणि चार मुखी तुपाचा दिवा लावून शिव चालीसा पठण करावे, यामुळे घरात सुख-शांती नांदेल.