धार्मिक मान्यतानुसार सूर्यग्रहण शुभ मानले जात नाही. २०२४ मध्ये दोन सूर्यग्रहण होतील, पहिले ८ एप्रिल २०२४ रोजी आणि दुसरे २ ऑक्टोबर २०२४ रोजी. अशा परिस्थितीत हे सूर्यग्रहण भारतात दिसणार की नाही? तसेच या दिवसाचा सुतक काळ कोणता आहे आणि कोणते नियम पाळावेत हे जाणून घ्या.
सूर्यग्रहण कालावधी:
भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी रात्री ९:१२ वाजता सुरू होईल आणि दुपारी १:२० वाजता समाप्त होईल. या सूर्यग्रहणाचा कालावधी ४ तास २५ मिनिटे असेल. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक काळ देखील भारतात वैध ठरणार नाही. नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी, काही सावधगिरी बाळगा.
या देशांमध्ये दिसणार सूर्यग्रहण :
भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आदी देशांमध्ये सूर्यग्रहण दिसणार नाही. तथापि, हे ग्रहण प्रामुख्याने कॅनडा, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स, पॅसिफिक अटलांटिक आणि अंटार्क्टिका यांसारख्या ठिकाणी दिसणार आहे.
(REUTERS)ग्रहण काळात या गोष्टी लक्षात ठेवा :
ग्रहण काळात घराबाहेर पडणे शुभ मानले जात नाही. विशेषत: ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये.
सूर्यग्रहण बघताना काळजी घ्यावी, सूर्यग्रहण थेट डोळ्यांनी पाहू नये. एखाद्या उपकरणाचा, चष्म्याचा, गॉगलचा वापर करूनच सूर्यग्रहण पाहावे.
सूर्यग्रहण काळात कात्री, चाकू इत्यादी गोष्टींचा वापर टाळा. तसेच, आपण शिवणकाम-भरतकाम केले नाही तर ते चांगले आहे, कारण सुई वापरण्यास देखील मनाई आहे. त्यांचा वापर केल्याने मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.