अभिनेत्री सोहा अली खानने आपली मुलगी इनाया नौमी खेमूसोबत दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद-उल-अजहाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोहा आणि इनाया दोघींनीही मॅचिंग कपडे घातले आहेत. भगव्या रंगाच्या ड्रेसवर पांढऱ्या रंग्याने वर्क केल्याचे दिसत आहे. दोघीही फोटोमध्ये आनंदी दिसत आहेत.
इनाया आणि सोहाने ईद निमित्त काही गोड पदार्थ बनवले होते. दोघींनीही त्याचा अस्वाद घेतला आहे. तसेच दोघींनीही या सणाचा आनंद घेताना स्वत:ला हव्या त्या गोष्टी केल्या आहेत.