मॉडेलिंग, साऊथ, बॉलिवूड आणि ओटीटीमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर शोभिता धुलिपाला आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. देव पटेलसोबतच्या तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
(All Photos: Instagram)'मेड इन हेवन', 'द नाईट मॅनेजर' आणि 'मेजर' सारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी शोभिता धुलिपाला आता आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
शोभिता 'मंकी मॅन' या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या अभिनेत्रीचा हॉलिवूडमधील डेब्यू चित्रपट आहे. यासोबतच शोभिताने आता जागतिक स्तरावरील भारतीय कलाकारांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
सध्या शोभिता धुलिपाला ही अभिनेता नागा चैतन्यसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दोघांनी अधिकृतरित्या या नात्याचा स्वीकार केलेला नाही. पण ते नेहमीच एकत्र दिसतात.