उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, गढवाल हिमालयातील हेमकुंड साहिब आणि कुमाऊंमधील मुनस्यारी या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. अनेक रस्ते बर्फामुळे बंद झाले होते. राज्यभरात थंडीचा कडाका वाढल्याने रस्त्यावर साचलेला बर्फ हा मोठ्या यंत्रांच्या साह्याने साफ करण्यात येत आहे.
(Uttarakhand DIPR-X)रुद्रप्रयागमधील केदारनाथमध्ये येथे देखील मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. केदारनाथ येथे आलेले पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत.
(Princess Ilvita)उत्तराखंडमधील चमोली येथे मंगळवारी जोरदार बर्फवृष्टी झाल्याने बर्फाच्छादित रस्त्यावरून एक व्यक्ती आपल्या गायींना फिरवत असतांना.
(ANI)हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील मनाली येथे मंगळवारी झालेल्या हिमवृष्टीनंतर एक व्यक्ती आपल्या कारवरील सचलेला बर्फ साफ करत होता. हवामान खात्याने बिलासपूर, उना, हमीरपूर आणि मंडी येथे थंडीचा 'ऑरेंज' अलर्ट दिला आहे. तर भाखड़ा धरण परिसर आणि मंडीतील बल्ह खोऱ्यातील काही भागात दाट धुक्याचा 'यलो' अलर्ट दिला आहे.
(ANI)