Snowfall disrupts normal life in HP and J&K : उत्तर भारतात थंडीची मोठी लाट आली आहे. आयएमडीनुसार, फेब्रुवारीमध्ये उत्तर भारतात सामान्यपेक्षा जास्त (दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या १२२ टक्क्यांहून अधिक) पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हिमाचल आणि जम्मू काश्मीरमध्ये हीमवर्षावामुळे जनजीवन विष्काळीत झाले आहे.
(1 / 9)
हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले, तर उत्तर भारतातील काही भागाला पावसाने झोडपले. उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढवली असून नागरिक हैराण झाले आहे. आयएमडीने फेब्रुवारीमध्ये देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (HT Photo/Deepak Sansta)
(2 / 9)
हिमाचल प्रदेशातील आदिवासी भाग आणि इतर उंच भागात वर्षातील पहिला मोठा हिमवर्षाव झाला, परिणामी चार राष्ट्रीय महामार्गांसह १३४ रस्ते बंद झाले. (ANI)
(3 / 9)
स्थानिक हवामान खात्याने शिमला, कुल्लू, चंबा, किन्नौर, आणि लाहौल आणि स्पिती या पाच जिल्ह्यांमध्ये मोठा हिमवर्षाव आणि पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (ANI)
(4 / 9)
दिल्लीला बुधवारी हाडांना गोठवणारी थंडी जाणवली. शहराच्या काही भागात हलका पाऊस देखील पडला. यामुळे कमाल तापमान १८.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. जे हंगामाच्या सरासरीपेक्षा चार अंशांनी कमी होते. आणि ७.३ अंश सेल्सिअस कमी होते, जे सामान्यपेक्षा एक अंश कमी होते. (Bloomberg)
(5 / 9)
सकाळी राष्ट्रीय राजधानीला दाट धुक्याने वेढले, ज्यामुळे दिल्ली विमानतळावरील किमान तीन उड्डाणे वळवली गेली आणि अनेक रेल्वे गाड्यांना उशीर झाला. (PTI)
(6 / 9)
जम्मू आणि काश्मीरमध्ये, श्रीनगर-लेह महामार्गावरील झोजिला अक्षासह उंच भागातील असंख्य भागात नवीन बर्फवृष्टी झाली, तर मैदानी भागात पावसाने थैमान घातले. (HT Photo/Deepak Sansta)
(7 / 9)
गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम या पर्यटन रिसॉर्ट्समध्ये रात्रभर नवीन हलका ते मध्यम हिमवर्षाव झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (HT Photo/Waseem Andrabi)
(8 / 9)
स्थानिक हवामान खात्याने जम्मू आणि काश्मीरमधील सहा जिल्ह्यांसाठी हिमस्खलनाचा इशारा जारी केला: पूंछ, बारामुल्ला, बांदीपोरा, कुपवाडा, डोडा आणि गंदरबल येथे अलर्ट जारी करण्यात आला आहे. (HT Photo/Waseem Andrabi)
(9 / 9)
Tourists enjoy snow covered Drang area of Tangmarg, about 50kms from Srinagar on Wednesday.(HT Photo/Waseem Andrabi)