रेडमी ए३ एक्स: रेडमी ए३ एक्स सेलमध्ये ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन ६ हजार ६८९ रुपयांना मिळत आहे. कंपनी फोनवर ३३५ रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्ही याची किंमत ६ हजार ३५० रुपयांपर्यंत कमी करू शकता. हा फोन ३२४ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर तुमचाही असू शकतो. फोनमध्ये ६.७१ इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळतोय, जो ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनचा मुख्य कॅमेरा ५००० एमएएच क्षमतेचा आहे.
टेक्नो पीओपी ८: ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या हा फोन सेलमध्ये ६ हजार ७९९ रुपयांत मिळत आहेत. बँक ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत १ हजार २५० रुपयांपर्यंत कमी करू शकता. फोनवर ३४९ रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकतो. हा फोन ३०० रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर खरेदी करता येऊ शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत ६ हजार ४५० रुपयांपर्यंत कमी करू शकता. टेक्नोच्या या फोनमध्ये ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटचा डिस्प्ले मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एम ०५: ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ ला सेलमध्ये ६,४९९ रुपये मिळत आहेत. फोनवर ३२५ रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत ६,१५० रुपयांपर्यंत कमी करू शकता. फोनचा ईएमआय ३१५ रुपयांपासून सुरू होतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर हा फोन ६.७ इंचाचा एचडी+ डिस्प्लेसोबत येतो. फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
रियलमी नार्झो एन ६३: रियलमी नार्झो एन ६३ फोनचा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट सेलमध्ये ७ हजार १९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर ३६० रुपयांपर्यंत कॅशबॅकसह खरेदी करू शकता. फोनचा ईएमआय ३४९ रुपयांपासून सुरू होतो. एक्स्चेंज ऑफरमध्ये याची किंमत ६ हजार ८०० रुपयांपर्यंत कमी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये तुम्हाला ८ जीबीपर्यंत डायनॅमिक रॅम मिळेल. फोनमध्ये दिलेली बॅटरी ४५ वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.