Skincare habits to improve acne-prone skin: तुमच्या चेहऱ्यावर पुरळ असल्यास, तुम्ही त्यावर उपचार करत असलात किंवा नसोत, तुम्ही दररोज काही खबरदारी घ्यावी ते जाणून घ्या.
(1 / 5)
चेहऱ्यावर जास्त वेळ धूळ किंवा घाण ठेवू नका. दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपला चेहरा क्लिन्झर किंवा फेसवॉशने धुवा. खूप गरम पाण्याने चेहरा धुवू नका. कोमट पाणी वापरा.
(2 / 5)
स्किन केअर साठी हार्ड प्रॉडक्टस वापरणे टाळा. नखांनी चेहरा स्पर्श करू नका. दिवसभर चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा. फक्त तुमच्या त्वचेसाठी योग्य किंवा डॉक्टरांनी सजेस्ट केलेली स्किन केअरचे प्रॉडक्टस वापरा.
(3 / 5)
तुमचे जीवन तणावमुक्त असावे. कारण तणावामुळेही पिंपल्सचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे तुमचा आहारही आरोग्यदायी असायला हवा. खूप तेल, खूप गोड, खूप चॉकलेट खाणे टाळा.
(4 / 5)
तुमचा टॉवेल दर दोन दिवसांनी धुवा आणि तोच टॉवेल जास्त वेळ वापरू नका. १५ दिवसातून एकदा बंद चादर धुवा. बेडशीटमधील धूळ आणि तेलाचे प्रमाण तुमच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचू शकते आणि पिंपल्स कारणीभूत ठरू शकते.
(5 / 5)
डोक्यातील कोंड्यामुळे पिंपल्स होऊ शकतात. त्यामुळे केसांच्या प्रकारानुसार डँड्रफ फ्री शॅम्पू वापरा.