माता सीतेचा जन्म वैशाख शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला झाला. या वर्षी वैशाख शुक्ल नवमी आज १६ मे रोजी सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी सुरू झाली असून, १७ मे सकाळी ८ वाजून ४८ मिनिटापर्यंत चालेल. या दिवशी माता सीतेची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, कारण सीतेला लक्ष्मीचे रूप मानले जाते.
सुखी वैवाहिक जीवन आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी सीता नवमीला माता सीतेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा, तसेच विवाहित स्त्रियांनाही सौभाग्याच्या वस्तू हळदी-कुंकू लावून द्या.
सीता नवमीला सीता चालिसाचे पठण करावे. असे मानले जाते की, याच्या प्रभावाखाली पती-पत्नीचे नाते अधिक घट्ट होते. प्रेम वाढते, कधीच मतभेद होत नाहीत.
सीता नवमीच्या पूजेत दूध अर्पण करा. नंतर सात मुलींना हे वाटून द्या. यामुळे आर्थिक संकटातून मुक्त होण्यास मदत होईल. तसेच पैशाची चणचणही भासणार नाही.
लवकर लग्न करायची इच्छा असेल तर सीता नवमीला श्री जानकी स्तुतीचा पाठ करा. असे मानले जाते की यामुळे कुंडलीतील अशुभ ग्रह दूर होतात. विवाहाची शक्यता निर्माण होते.