‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची विजेती कार्तिकी गायकवाड कायमच चर्चेत असते. या कार्यक्रमाने कार्तिकाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले आहे. तिने सुमधूर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकली आहेत. २०२० साली तिने रोनित पिसेशी लग्न केले. त्यानंतर आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर कार्तिकी आई होणार असल्याचे समोर आले होते. आता कार्तिकच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
कार्तिकीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आई झाल्याचे सांगत मुलगा झाल्याची बातमी दिली आहे. चाहत्यांनी कार्तिकीच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
'माझ्या हाताता इतके कोणाचेही बोट योग्य पद्धतीने मावणार नाही आणि मला हे खूप छान वाटत आहे. माझ्या लहान मुलाचा हात हातात घेताना मला आनंद होत आहे', अशी पोस्ट कार्तिकीने केली आहे.