नुकतीच २९ मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची दुसरी पुण्यतिथी झाली. सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आज आम्ही तुम्हाला अशाच इतर गायकांबद्दल सांगत आहोत, ज्यांची हत्या झाली होती.
बरोबर दोन वर्षांपूर्वी २९ मे रोजी सिद्धू मुसेवाला याची सहा हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा आरोपी लॉरेन्स बिष्णोई आधीच तुरुंगात असून, त्याने तुरुंगात असताना पंजाबी गायकाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
सिद्धू मुसेवाला प्रमाणे अमरसिंह चमकीला हे देखील पंजाबी इंडस्ट्रीतील मोठे नाव होते. ८०च्या दशकात चमकीला यांची गाणी प्रत्येक तरुणाच्या ओठावर होती. गोळ्या झाडून त्यांची हत्या झाली, तेव्हा चमकीला अवघ्या २७ वर्षांचे होते.
अमरसिंह चमकीला हे पत्नी अमरजोत कौरसोबत स्टेजवर परफॉर्म करायचे. त्यांची पत्नीही पंजाबमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक होती. १९८८मध्ये अमरोजत आणि अमरसिंह चमकीला यांची काही तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
गुलशन कुमार यांचे नाव बॉलिवूडमधील बड्या व्यक्तींमध्ये सामील आहे. गुलशन कुमार हे भजन गाण्यासाठी ओळखले जात होते. १९९७मध्ये मुंबईतील एका मंदिराबाहेर गुलशन कुमार यांच्यावर १६ गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर गायकाचा मृत्यू झाला.
२०२२मध्ये हरियाणवी गायिका संगीता यांचीही हत्या झाली होती. संगीताच्या हत्येचा आरोप तिचे मित्र अनिल आणि रवी यांच्यावर होता. झोपेच्या १० गोळ्या देऊन संगीता यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.