मीठ कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यास मदत करते. तुम्ही कितीही चांगली डिश बनवली तरी ती मीठाशिवाय अपूर्णच राहते. पण आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत...
(freepik)उच्च रक्तदाब-
जर तुम्हाला रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर जास्त मीठ खाणे तुमच्यासाठी विषारी ठरू शकते. कारण मीठ रक्तदाब वाढवण्याचे काम करते. आणि जर तुम्हाला रक्तदाबाची कोणतीही समस्या नसेल पण तुम्ही दररोज खूप जास्त मीठ खात असाल तर तुम्हाला भविष्यात या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
हाडे कमकुवत होतात-
मिठाच्या अतिसेवनामुळे हाडे कॅल्शियम गमावू लागतात. आणि 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये हळूहळू हाडांची घनता कमी होऊ लागते. त्यामुळे 30 नंतर मिठाचे सेवन कमी करावे.
वजन वाढवते-
जास्त मीठ खाल्ल्याने तुमची भूक विनाकारण वाढते. परिणामी तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे सुरू करता आणि त्यामुळे वजन वाढते.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य-
जर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार किंवा समस्या असतील तर तुम्ही तुमच्या आहारात जास्त मीठ वापरू नये कारण मिठाच्या जास्त सेवनाने हृदयाच्या समस्या वाढू शकतात.
किडनीचे आरोग्य-
जास्त मीठ खाल्ल्याने किडनीवरही ताण पडतो आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.