(5 / 4)'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'मध्ये आतापर्यंत 'शार्क टँक' या कार्यक्रमामधील नमिता थापर, अभिनेत्री उर्वशी रौतेला, दिप्ती साधवानी, ऐश्वर्या राय बच्चन यांनी आपला जलवा दाखवला आहे. तसेच आरजे करिश्मासारखे नवोदित चेहरेदेखील यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जलवा दाखवताना दिसून येतील. मराठमोळी अभिनेत्री छाया कदमदेखील 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'साठी रवाना झाली आहे. 'चलो कान्स' म्हणत चाहत्यांना तिने आनंदाची बातमी दिली.