सध्याची चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. तिने वयाची ४० ओलांडली असली तरी हॉटनेसच्या बाबतीत ती एखाद्या तरुण अभिनेत्रीला देखील टक्कर देताना दिसत आहे. श्वेताचे फोटो कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर श्वेताच्या ट्रीपची चर्चा रंगली आहे.
श्वेता तिवारी तिच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून थायलंडला फिरायला गेली आहे. या ट्रीपमध्ये तिच्यासोबत तिचा मुलगा देखील दिसत आहे. श्वेताने या ट्रीपमध्ये मजामस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्वेताना शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती थायलंडच्या समुद्र किनारी असल्याचे दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाची मनोकिनी परिधान केली असून मोकळे केस सोडले आहेत. या लूकमध्ये श्वेता अतिशय हॉट दिसत आहे.
या फोटोमध्ये श्वेताने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची शॉर्ट जीन्स परिधान केली आहे. तसेच स्लिंग बॅग घेतल्याने श्वेताचा लूक आणखी आकर्षक बनला आहे.
श्वेताने थायलंडमध्ये एका बुद्ध मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. या फोटोमध्ये तिने लांब असा फ्रॉक स्टाइल ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये श्वेता अतिशय सुंदर दिसत आहे.
उन्हाळा म्हटलं की आंब्याचा सिझन. श्वेताने थायलंडच्या रस्त्यावर आंबे खाल्ले आहेत. तिने आंबा खातानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आंबा खाताना श्वेताच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.