सध्या ‘बिग बॉस १८’बद्दल खूप हाईप आहे. या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या मोसमातील विजेत्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. बरं, ‘बिग बॉस १८’च्या फिनालेला अजून वेळ आहे. पण, त्याआधी आपण त्या टीव्ही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी आतापर्यंत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे.
‘बिग बॉस ओटीटी ३’ची विजेती सना मकबूल होती. तिच्यासोबत ‘टॉप ५’मध्ये सना मकबूल, कृतिका मलिक, सई केतन राव, नेझी आणि रणवीर शौरी होते.
‘बिग बॉस सीझन १५’ची विजेती टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश होती. या सीझनमध्ये तिची आणि करण कुंद्राची जोडी खूप पसंत केली गेली होती. सध्या दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने १२व्या सीझनची ट्रॉफी जिंकली आहे. या सीझनमध्ये तिला बक्षीस म्हणून ३० लाख रुपये मिळाले.
'भाभी जी घर पर हैं' फेममध्ये 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेने सीझन ११चे विजेतेपद पटकावले.
उर्वशी ढोलकियाने ‘बिग बॉस सीझन ६’ची चमकदार ट्रॉफी जिंकली. तिला ५० लाखांचे बक्षीस मिळाले होते.
या यादीत जुही परमारच्या नावाचाही समावेश आहे. जुहीने ‘बिग बॉस सीझन ५’ची ट्रॉफी जिंकली होती. तिला बक्षीस म्हणून १ कोटी रुपये मिळाले होते.