ग्रहांच्या राशी बदलाचा राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. काही ग्रहांच्या राशीबदलामुळे शुभ योग तयार होतात तर दोन ग्रहांचे एकत्र येणे देखील काही राशींना मोठा फायदा मिळवून देते.
नऊ ग्रहांपैकी शुक्र हा प्रेमाचा कारक ग्रह आहे. याव्यतीरीक्त धन, समृद्धी, संतती, ऐशोआराम इत्यादींसाठी शुक्र ग्रह कारक आहे. महिन्यातून एकदा शुक्र ग्रह राशीपरिवर्तन करू शकतो. शुक्राच्या संक्रमणाचा सर्व राशींवर मोठा प्रभाव पडतो. काही राशींना मोठी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
सूर्य हा नऊ ग्रहांचा स्वामी आहे.नवग्रहांमध्ये सूर्य सर्वात शक्तिशाली असून महिन्यातून एकदा आपली स्थिती बदलू शकतो. कर्क राशीत रवि आणि शुक्राची युती झाली आहे ज्यामुळे शुक्रयोग तयार झाला आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. परंतू, काही राशींना हा राजयोग नफा मिळवून देईल.
कन्या :
आपल्या राशीच्या अकराव्या भावात सूर्य आणि शुक्र एकत्र आहेत. यामुळे उत्पन्नात चांगली प्रगती होईल, उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील, जीवनात अनपेक्षित वेळी चांगल्या कामांमध्ये वृद्धी होईल आणि इतरांच्या सन्मानात वाढ होईल.
कर्क :
आपल्या राशीच्या पहिल्या भावात रवि आणि शुक्राची युती झाली. यामुळे प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. प्रलंबित असलेली सर्व कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळेल. जुनी येणी वसुल होईल.