वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील प्रत्येक व्यक्तीवर ग्रहांच्या संक्रमणाचा प्रभाव असतो. काहीवेळा एका राशीत दोन ग्रह येण्याने ग्रहांची युती होते आणि ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव मानवी जीवनावरही दिसून येतो. २०२४ च्या अखेरीस कर्माचे फळ देणारा शनिदेव आणि सुख संपत्तीचा कारक शुक्र यांची युती होणार आहे.
शनी हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह मानला जातो. तो कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, ज्याचा प्रभाव १२ राशींवर बराच काळ पडतो.
तसेच शुक्र आपली राशी बदलणार आहे. शुक्र हा राक्षसांचा गुरू मानला जातो. परंतु शुक्र हा आनंद, सौंदर्य, आकर्षण, धन आणि सुख-समृद्धी देणारा ग्रह आहे. शुक्राच्या राशीबदलामुळे लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. अशा प्रकारे एखाद्या राशीत शुक्र आणि शनीची युती अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करू शकते. वर्षाच्या अखेरीस शुक्र आणि शनी कुंभ राशीत एकत्र येणार आहेत.
२८ डिसेंबरला शुक्र मकर राशीतील प्रवास थांबवून कुंभ राशीत प्रवेश करेल. जिथे शनिदेव आधीपासूनच उपस्थित आहेत. शुक्र २८ जानेवारी २०२५ पर्यंत कुंभ राशीत राहील. अशा प्रकारे काही राशीच्या लोकांना वर्षाच्या सुरुवातीला शनी आणि शुक्राच्या युतीचा विशेष लाभ मिळू शकतो.
कर्क :
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र-शनी ची युती खूप फायदेशीर ठरेल. हे आपल्या नवव्या भावात म्हणजेच भाग्य आणि धर्माच्या स्थानी आहे. अशा परिस्थितीत २०२५ मध्ये तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. आपल्याला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो जिथे आपल्याला अतिरिक्त पैसे कमविण्याच्या भरपूर संधी मिळतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यावेळी चांगली नोकरी मिळू शकते. जीवनात भौतिक सुखसोयी वाढतील. जीवनात सर्व प्रकारचे सुख मिळेल. दांपत्य जीवन चांगले राहील.
तूळ :
तुळ राशीच्या लोकांना शनी आणि शुक्राच्या युतीचा जास्तीत जास्त फायदा होईल. तुमच्या राशीत शनी-शुक्राची युती पंचम भावात असेल. अशावेळी नशीब तुमच्या पाठीशी असू शकते. आपण आपल्या करिअरमध्ये मोठी उंची गाठू शकता. आपण शिक्षण क्षेत्रात मोठा टप्पा गाठू शकता किंवा कठीण परीक्षेचा निकाल आपल्या बाजूने येऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या पगारआणि पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या जातकांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत मिळू शकतात. व्यवसायात चांगले यश आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढू शकते. जे लोक कोणत्याही व्यवसायात गुंतलेले आहेत त्यांना चांगला नफा मिळू शकतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचे ही संकेत आहेत. आरोग्य चांगले राहील आणि कुटुंबातील सदस्यांकडून चांगले सहकार्य मिळेल.
कुंभ :
शनी आणि शुक्राची ही युती तुमच्या राशीत तयार होईल. ज्यामुळे ते तुमच्यासाठी खूप चांगले सिद्ध होईल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी उत्तम संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात आणि पदोन्नतीचीही शक्यता आहे. आपल्या जीवनात ऐशोआराम आणि सुखसोयी वाढतील. समाजात चांगला सन्मान मिळेल.