ज्योतिषीय गणनेनुसार धन आणि समृद्धीचा प्रतीक शुक्र २८ जानेवारी रोजी मीन राशीत भ्रमण करेल. शुक्राचे हे संक्रमण खूप खास आहे कारण १९ वर्षांनंतर राहू आणि शुक्र ग्रहाची मीन राशीत युती होत आहे. शुक्र आपल्या उच्च राशीत प्रवेश करेल. अशावेळी शुक्राची राशी परिवर्तन पाच राशींसाठी खूप फायदेशीर ठरते. कारण राहू हा छाया ग्रह असून शुक्र हा असुरांचा गुरू आहे. अशा तऱ्हेने या दोन ग्रहांची युती पाच राशीच्या लोकांसाठी अचानक लाभ आणि प्रगती घेऊन येईल. जाणून घेऊया कोणत्या राशीला राहू आणि शुक्राच्या युतीचा अचानक फायदा होऊ शकतो.
मिथुन :
शुक्राचे हे संक्रमण मिथुन राशीच्या दहाव्या भावात होईल. कौटुंबिक शांती आणि आनंद मिळेल. नवीन वाहन खरेदी होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना त्यांच्या प्रयत्नांचे उत्तम फळ मिळेल. संभाषण कौशल्य सुधारेल, जे लोकांना प्रभावित करेल. अतिविचार टाळा आणि शांतता राखा.
वृश्चिक :
शुक्राचे संक्रमण वृश्चिक राशीच्या पंचम भावात होईल. प्रेम संबंधांमध्ये गोडवा येईल. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारेल. सामाजिक लोकप्रियतेत वाढ होईल. व्यवसायात आणि मोठ्या करारांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच तुमचा कल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांकडे राहील.
धनु :
शुक्राचे संक्रमण धनु राशीत कौटुंबिक आणि भौतिक समृद्धी आणेल. कौटुंबिक संबंध दृढ होतील. नवीन कार खरेदी करणे किंवा घराचे नूतनीकरण होऊ शकते. करिअरमध्ये प्रगती होईल. धार्मिक कार्य आणि अध्यात्मात रुची वाढेल. या बदलादरम्यान तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर वाटेल.
कुंभ :
कुंभ राशीच्या दुसऱ्या भावात शुक्राचे संक्रमण होणार आहे. अशावेळी कुटुंबीय आणि मित्रांसोबत प्रवास करण्याची शक्यता राहील. रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात नफा होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात वाढ होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. घरातील आणि आजूबाजूचे वातावरण सकारात्मक राहील.
मीन :
शुक्राचे संक्रमण मीन राशीच्या पहिल्या भावात होईल. अशा स्थितीत या संक्रमणादरम्यान आर्थिक स्थिती भक्कम राहील आणि भरपूर आर्थिक लाभ मिळतील. भावंडांशी संबंध दृढ होतील. दांपत्य जीवनात शांतता आणि समजूतदारपणा वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायातून विशेष लाभ मिळेल. तसेच तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी आणि आकर्षक असेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)